सिल्लोड, (प्रतिनिधी) अशोकदादा गरुड शैक्षणिक समूह संचलित ज्ञानविकास प्राथमिक विद्यालय भराडी येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा पाया मजबूत करण्यासाठी पूर्वज्ञाना जाणून घेण्यासाठी पूर्व अभ्यासावर आधारित चाचणी परीक्षा घेण्यात आली.
तुकडी निहाय उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देत सन्मानित करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यामध्ये सुशांत खांदवे, मोहित राजपूत, प्रणित शिंदे, स्वराज काकडे,
प्रणव कौटिये, हिंदवी काकडे, स्वराली घडमोडे, ऋतुजा काकडे, ओम पंडित, ज्ञानेश्वरी साळवे, देवानंद राकडे, रुपेश दुतोंडे, वेदांत काकडे, रुद्र आग्रे, रोशनी चाथे, सोनाक्षी भोजने, साईराज शेळके, साई काकडे, स्नेहल काकडे, वैभव दौड, ओम मुरकुटे, हर्षल आग्रे, देवेंद्र निकम, दिव्या माचवे, सार्थक सोनवणे, वेदिका गायके, जुनेद पटेल, सोहम शिंदे, प्रणव निकम, भक्ती निकम आदीं गुणवंतांचा समावेश होता. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
त्यांच्या पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.











